RSS

मधुराष्टकम् | (मराठी)

22 जनवरी

You are here: HomeIndex नित्योपयोगी स्तोत्र

काही दिवसांपूर्वी जुना शिवप्रवाहचा अंक वाचनात आला. त्यात एक सुंदर अनुभव वाचला. स्वतः परमपूज्य ‘बां’ नी एका ठिकाणी तो सांगितला आहे. दी़क्षा प्राप्त झाल्यानंतरच्या दोन वर्षात हा अनुभव त्यांना आला. दुपारचे भोजन करत असताना ध्यान लागू नये असा खूप प्रयत्न त्या करायच्या. एका पाटावर पान ठेवून जेवायचा त्यांचा प्रघात होता. कसे कुणास ठाऊक ध्यान लागत असे, आणि ज्यावेळी जागृत अवस्थेत त्या येत तेव्हा पानातले कोणीतरी जेवले आहे, थोडे इकडे तिकडे सांडले आहे असे दिसायचे. दोन छोटे छोटे हात येऊन त्यांना जेवण्यापासून परावृत्त करायचे असेही जाणवायचे. कालांतराने स्वत: भगवान् कृष्ण प्रसाद ग्रहण करायला येतात याचा प्रत्यय ध्यान करीत असताना आला. हा सगळा अनुभव मुळातूनच वाचण्यासारखा आहे. येथे जरूर वाचा.

वाचत असताना मनात विचार आला, ही खर्‍या अर्थाने मधुरा भक्ती !

‘आज गोकुळात रंग खेळतो हरी’… अशा शब्दात सुरेश भटांनी या रासक्रीडेचं वर्णन केलं,  ‘राधाधरमधुमिलिंद जय जय..’अशा शब्दात अण्णासाहेब किर्लोस्करांनी जयजयकार केला, ‘राधा कृष्णावरी भाळली’ म्हणत पी. सावळारामानी त्यांच्या मीलनाचं वर्णन केलं , असा ‘कृष्ण’.  त्याचं सारं वर्तन …अवतीभवतीचं विश्वच मधुर ….गोड , सारं मुरलीच्या स्वरांनी नादावलेलं, भक्तीरसाने भारावलेलं !

या विचारांच्या आवर्तात आठवलं ते ‘मधुराष्टकम्’. श्रीमद् वल्लभाचार्यांची प्रासादिक रचना ज्यात पुष्टिमार्गीय भक्तीचे सूर आळवलेले आहेत.  त्या कृष्णाच्या वाणीत गोडवा, त्याचं चालणं सुडौल, हसणं लाघवी, वस्त्रप्रावरणं आकर्षक, गळ्यातले हार सुगंधी , त्याने वाजवलेला पावा वेड लावणारा, सुस्वर, रूप मनोहारी, अंगप्रत्यंग लावण्यमयी, त्याचं नृत्य सुंदर, हातातलं लीलाकमळ अप्रतिम, गोपी, यमुनेचा परिसर सारं अतिशय मधुर्….खरं तर त्याचं अस्तित्व सार्‍या अणुरेणुत भरून राहिलंय ! त्यामुळेच हे सारं मधुर, हवंहवंसं आहे.

मोठं विलक्षण आहे हे स्तोत्र. जग मिथ्या, खोटं असं नाहीच. ती परमेश्वराची निर्मिती आहे. ती सुंदरच असणार आणि खरी देखील!  हा विचार किती प्रभावीपणे मांडलाय इथे. वल्लभाचार्य हे पुष्टिमार्गाचे प्रवर्तक होते. भगवंताची भक्ती हाच त्याच्या पर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे असा विचार त्यांनी आपल्या भाष्यांतून मांडला. बाळकृष्णाची वात्सल्यभावाने भक्ती या मार्गात सांगितली आहे. नामजपाला खूप महत्त्व दिले आहे.

सगुण साकार स्वरूपात परमेश्वराची भक्ती केल्यास गोलोक प्राप्त होतो. हीच मुक्ती होय असा विचार त्यांनी मांडला.

back to नित्योपयोगी स्तोत्र
back to Stotra

Advertisements
 

एक उत्तर दें

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदले )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदले )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदले )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदले )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: