RSS

वागीश्वरी (मराठी)

11 मई

खूप वर्षांपासून एक सुंदर सरस्वती वंदना ऐकण्यात आहे...जय शारदे वागीश्वरी!

आशा भोसल्यांचा स्वर, शांताबाई शेळक्यांचे शब्द, श्रीधर फ़डके यांचे संगीत..एक अपूर्व काव्यानुभव आहे हा!

या संस्थळाचे नाव ‘वागीश्वरी’ का? हा प्रश्न मला अनेक लोकानी विचारला. या प्रश्नाचे उत्तर या कवितेत  आहे.

मी जेव्हा जेव्हा परमपूज्य प्रभु बा यांचे फ़ोटो पहाते, एक दोन वेळाच त्यांचा आवाज ऐकण्याचा योग आला,वारंवार लेखन वाचते, मला पुन्हा पुन्हा ते साक्षात सरस्वतीचे मूर्त रूप वाटते.

‘वागीश्वरी’ म्हणजे ईश्वरी वाणी,  आपल्या गुरुदेवांच्या मुखातून येणारी वाणी ही ईश्वरी आहेच. दुसरा अर्थ देवी सरस्वती…विद्येची देवता ! आपलं “जाड्य” आळस दूर करणारी, आपल्याला कार्यक्षम करणारी!

या संपूर्ण कवितेतलं वर्णन आपल्या गुरु परमपूज्य बांना लागू पडतं… सरस्वती, साक्षात् ब्रह्मदेवाची कन्या, विद्या धारण करणारी देवता ! इतकेच नव्हे तर   ज्योत्स्ना म्हणजे चांदण्यासारखी तुझी कांती आहे. तुझे मुख म्हणजे शारदीय चंद्रमा ! तुझ्या हास्यातून चारी युगांची पौर्णिमा उजळते ! तुझ्या कृपेचे चांदणे आमच्या शिरी नेहेमीच बरसत राहू दे!

हे देवते, तुझी चतुर , कलामय अंगुली  वीणेवर फ़िरते तेव्हा नवे संगीत जन्माला येते! कल्पतरुवर मोहोर यावा त्याप्रमाणे कल्पनांना नवे नवे अंकुर फ़ुटतात! सृजनशीलता जागृत होते ! जाड्य, बुद्धिमांद्य नष्ट होते!

हे देवते, तुला सर्व विद्या, कला, संस्कृती, शास्त्रे वश आहेत. तुझ्या प्रतिभस्पर्शामुळेच रुचिर कलाकृती जन्माला येतात, तुझ्यामुळेच या विश्वातील अप्रतिम लावण्ययात्रा दृष्टोत्पत्तीस येते…!

अगदी हेच तर आपल्या गुरु आपल्यासाठी करीत आहेत. म्हणूनच जय शारदे ’वागीश्वरी ’ !

back to वागीश्वरी

Advertisements
 

2 responses to “वागीश्वरी (मराठी)

  1. rani

    मई 19, 2011 at 11:44 पूर्वाह्न

    आपल्या प पु प्रभु बांचे वर्णन आहे हे . तू प्रत्यक्ष दर्शाना नंतर वर काय लिहिशील ?
    उत्तम !

     

एक उत्तर दें

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदले )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदले )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदले )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदले )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: