RSS

|| श्रीगुरुपादुकाष्टम् ||

02 जुलाई

ज्या संगतीनेंच विराग झाला। मनोदरीचा जडभास गेला॥
साक्षात्परमात्मा मज भेटवीला ॥ विसरुं कसा मी गुरुपादुकांला॥१॥

सद्योगपंथे घरिं आणियेलें । अंगेच मातें परब्रह्म केलें ॥
प्रचंड तो बोधरवी उदेला ॥ विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥२॥

चराचरीं व्यापकता जयाची। अखंडभेटी मजला तयाची॥
परंपदी संगम पूर्ण झाला ॥ विसरुं कसा मी गुरुपादुकांला  ॥३॥

जो सर्वदा गुप्त जनांत वागे। प्रपन्नभक्ता निजबोध सांगे ॥
सद्भक्तिभावा करितां भुकेला ॥ विसरुं कसा मी गुरुपादुकांला  ॥४॥

अनंत माझे अपराध कोटी। नाणी मनीं घालूनि सर्व पोटीं ॥
प्रबोधकरितां श्रम फ़ार झाला ॥ विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥५॥

कांही मला सेवनही न झालें । तथापि तेणे मज उद्धरीलें ॥
आता तरी अर्पिन प्राण त्याला ॥ विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥६॥

माझा अहंभाव वसे शरीरीं । तथापि तो सद्गुरु अंगिकारी॥
नाही मनी अल्प विकार ज्यालां । विसरुं कसा मी गुरुपादुकांला  ॥७॥

आतां कसा मी उपकार फ़ेडूं । हा देह ओवाळून दूर सांडू ॥
म्यां एकभावें प्रणिपात केला । विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥८॥

जयां वानिता वानिता वेदवाणी । म्हणे नेति नेती ति लाजे दुरुनी॥
नव्हे अंत ना पार ज्याच्या रुपाला ॥ विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥९॥

जो साधुचा अंकित जीव जाला। त्याचा असे भार निरंजनाला ॥
नारायणाचा भ्रम दूर केला ॥ विसरुं कसा मी गुरुपादुकांला  ॥१०॥

इति श्रीनारायणविरचितं गुरुपादुकाष्टकं संपूर्णम् ॥

श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

back to नित्योपयोगी स्तोत्र

back to  स्तोत्र

Advertisements
 
टिप्पणी करे

Posted by on जुलाई 2, 2012 in नवीन

 

एक उत्तर दें

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदले )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदले )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदले )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदले )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: